क्रीडापुणे

‘ऑलिम्पिकवीर’ स्वप्नील कुसाळेचं दगडूशेठ गणपतीशी ‘खास कनेक्शन’

महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथील स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळविले आहे. ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये त्यांना हे पदक मिळाले असून वैयक्तिक पदक मिळविणारे महाराष्ट्रातील तो दुसरे खेळाडू ठरला आहे.पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला असून पुणे विमानतळावर स्वप्नील चे जोरदार स्वागत करण्यात आले.यानंतर स्वप्नील ने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली यावेळी ट्रस्ट कडून स्वप्नील चे स्वागत करण्यात आले.

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी स्वप्नील म्हणाला की पहिले गणपती बाप्पा मोरया..बाप्पाच्या मुळेच सर्व काही आहे म्हणून पाहिले बाप्पा ला भेटायला आलो आहे.जे मागितलं आहे ते बाप्पाने आजपर्यंत दिलं आहे.अस यावेळी स्वप्नील ने सांगितल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये