ताज्या बातम्यामनोरंजन

सत्य घटनेवर आधारित ‘रावरंभा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | जरी काळ बदलत असला तरी, प्रेमाची संकल्पना बदलत नाही. इतिहासात अनेक प्रेमकथा होऊन गेल्या. त्यातील काही प्रेमकथा अजूनही अजरामर आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अशीच एक अनोखी प्रेमकथा मराठी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी ‘रावरंभा’ (Raavrambha) या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

‘मुळशी पॅटर्न’च्या माध्यमातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भूतकर (Om Bhutkar) आणि सौंदर्यासोबत अभिनयाचा सुरेख मिलाफ असलेली गुणी अभिनेत्री मोनालिसा बागल (Monalisa Bagal) ‘रावरंभा’ चित्रपटातून जोडीच्या रूपाने समोर येणार आहेत. येत्या 12 मे ला जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. ‘रावरंभा’चं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून ते आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. निर्माते निर्माते-शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.

या चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहेत. शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये