ताज्या बातम्यापुणे

खंडोबाच्या सोमवती यात्रेनिमित्त पुणे ग्रामीण हद्दीत वाहतुकीत बदल

Somvati Amavasya Yatra 2023 : ‘यळकोट यळकोट.. जय मल्हार’ जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण करत आज बहुजनांचा कुलस्वामी असलेल्या जेजुरी खंडोबा देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाली. जेजुरी गडावर आज सोमवती यात्रा (Somvati Yatra) भरली आहे. त्यामुळे लाखो भाविकांनी आज गडावर हजेरी लावली आहे (Khandoba Yatra Jejuri). त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 13 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करून अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आले आहेत.

image 3 4

सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्ग क्रमांक 65 वरून पुणे यामार्गाने वळविण्यात आली आहे. पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतुक बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव रोड मार्ग बारामती या मार्गे वळविण्यात आली आहे.

image 3 5

बारामती व निरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली असून ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात आली आहे. पुणे बाजुकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड वाहनांची वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे-वीर-वाठार मार्गे लोणंद या मागे वळविण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये