ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं घरोघरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन!

नवी दिल्ली | Har Ghar Tiranga – भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारनं ‘हर घर तिरंगा’ मोहीमेची योजना आखली आहे. केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

“या वर्षी आपण ‘आझादी का अमृत’ उत्सव साजरा करत असताना ‘हर घर तिरंगा’ चळवळीला बळ देऊया. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल”, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसंच भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याचे छायाचित्रही त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीमेची योजना आखली आहे. यासंदर्भात ट्विटरवर माहिती देताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले, या मोहिमेद्वारे देशभरातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल, जो प्रत्येक नागरिकाच्या मनात विशेषतः तरुणांच्या मनात देशभक्तीची अखंड ज्योत अधिक प्रज्वलित करण्याचे काम करेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये