Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मध्यावधी निवडणुकीबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…

पुणे – भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. सभागृहात विश्वासठराव मंजूर झाल्यानंतर सर्वजण आपल्या मतदारसंघात दाखल झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघात आल्यावर जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना पवारांनी केलेल्या वक्तव्यावर पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कार्यकर्त्याचं मनोबल वाढवण्यासाठी असं म्हणावं लागतं. तसेच काल एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे पवारसाहेब जे म्हणतात, त्याच्या उलटं त्यांना म्हणायचं असतं असं पाटील म्हणाले. त्यासोबतच, हे सरकार भाजपचं की बंडखोरांच?, असा सवालही पाटलांना करण्यात आला.

दरम्यान, बंडखोर हा शब्दच चुकीचा आहे. हे सरकार भाजप आणि शिवसेना युतीच आहे. भाजपमध्ये कुठलीही नाराजी नाही. हिंदुत्वाच रक्षण करणारं आणि विकास कामांना चालना देणारं हे सरकार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये