ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर ‘ससून’चे डीन म्हणून पुन्हा एकदा डॉ. विनायक काळेंची नियुक्ती
पुणे | Sasoon Hospital : ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज प्रकरणामुळे पुण्यातील (Pune) ससून रूग्णालय (Sasoon Hospital) चांगलंच चर्चेत आलं आहे. ललित ड्रग्ज प्रकरणामुळे ससून रूग्णालयाच्या डीन पदावर परिणाम होत आहे. डॉ. विनायक काळे (Dr. Vinayak Kale) यांना ससूनच्या डीन पदावरून दीड वर्षांपूर्वी हटवण्यात आलं होतं. तर आता पुन्हा एकदा त्यांची रूग्णालयाचे प्रभारी डीन म्हणून वर्णी लागली आहे.
डॉ. विनायक काळे यांच्या वर्णीवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने शिक्कामोर्तब झालं आहे. उच्च न्यायालयानं डॉ. काळे यांच्याकडे ससून रूग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा तात्पुरत्या स्वरूपात पदभार देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता डॉ. काळे ससूनचे प्रभारी डीन म्हणून कारभार पाहणार आहेत.
जानेवारी 2023 मध्ये डॉ. विनायक काळेंची ससून रूग्णालयात डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रशासकीय बदलीमध्ये महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या बदलीनंतर काळेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निकाल देताना न्यायालयानं डॉ. काळे यांच्याकडे ससून रूग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा तात्पुरत्या स्वरूपात पदभार देण्यास मान्यता दिली आहे.
डॉ. काळे यांच्याकडे ससून रूग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा कारभार तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच डॉ. संजीव ठाकूर यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.