ताज्या बातम्यारणधुमाळी

मुसेवालाच्या मारेकऱ्यांपैकी पोलिसांनी केला एकाचा खात्मा, असा रंगला थरार!

नवी दिल्ली | Sidhu Moosewala Murder Case – भारत- पाक सीमेजवळील अटारी बाॅर्डरजवळ पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक सुरू आहे. ही चकमक सिद्धू मुसेवाला यांचे मारेकरी आणि पंजाब पोलीस यांच्यात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये संशयित जगरुपसिंग रुपाला पोलिसांनी ठार केलं आहे. या चकमकीमध्ये दोन-तीन पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सिद्धू मुसेवाला यांचे संशयित मारेकरी आणि पोलीस यांच्यात चकमक सुरू आहे. अमृतसर जिल्ह्यातील पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या चिचा भकना गावात ही चकमक सुरू आहे. पोलीसांनी आजूबाजूच्या लोकांना घरातच राहण्यास सांगितलं आहे. हे गुंड एका जुन्या घरामध्ये लपले आहेत. तिघांपैकी एकाला पोलिसांनी ठार केलं आहे. चिचा भकना गावापासून पाकिस्तानची सीमा केवळ 100 मीटर अंतरावर आहे. अशा स्थितीत हे गुंड पाकिस्तानात घुसण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन किमी परिसराला पूर्णपणे वेढा घातला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोलिसांच्या मदतीसाठी सध्या भारत-पाक सीमेवरून पोलिसांची अनेक वाहने पोहोचली आहेत. जगरूपसिंग रूपा आणि मन्नू कुसा हे दोन गुंड एका निर्जन भागात बांधलेल्या जुन्या वाड्यात लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या दोन तासांपासून ही चकमक सुरू आहे. त्यामुळे या गुंडांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याचं म्हटलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये