चित्रकार प्रमोद कबाडे यांच्या चित्रांना सर्वाधिक पसंती
मुंबई | मुंबईमध्ये भरविण्यात आलेल्या ‘The Haat of Art’ या पेंटिंग प्रदर्शनामध्ये मिरजचे सुपुत्र आणि सर्जनशील कलाकार असलेले चित्रकार प्रमोद कबाडे यांच्या चित्रांना सर्वाधिक पसंती मिळाली. या प्रदर्शनाचे उद्घाटक विंदु दारा सिंग आणि सुनील शेट्टी यांनी देखील कबडे यांच्या चित्रांची प्रशंसा केली.
९ ते ११ नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये गोरेगाव येथील बॅांबे एक्झिबीशन सेंटरमध्ये या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील अनेक चित्रकार, मान्यवर संशोधक तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ रंगकर्मी यानी या चित्र प्रदर्शनाला भेट दिली. सुमारे दहा हजार चित्रकृती असलेल्या या प्रदर्शनात 500 हून अधिक कलाकारांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन होते.
दरम्यान, त्या सर्वांमध्ये ग्रामीण महाराष्ट्रातून आलेल्या प्रमोद कबाडे यांच्या चित्रांची फार मोठी प्रशंसा झाली. त्यांनी काढलेल्या गणेश, विठ्ठल, पारंपरिक स्त्री अशा अनेक चित्रांची या प्रदर्शनामध्ये मोठी चर्चा पाहायला मिळाली.