भारताची ऐतिहासिक चंद्रभरारी! पाकिस्ताननेही दिल्या चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा
नवी दिल्ली | Chandrayaan 3 – आज (23 ऑगस्ट) भारत ऐतिहासिक चंद्रभरारी घेणार आहे. भारताचं चांद्रयान-3 (Chandrayaan 3) आज सायंकाळी 5 वाजून 44 मिनिटाला चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे जर भारताने चंद्रावर यान उतरवले तर भारत हा दक्षिण चंद्रावर यान उतरवणारा पहिला देश ठरणार आहे. अशातच आता चांद्रयान मोहिमेसाठी पाकिस्तानकडून भारताला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
भारताच्या या ऐतिहासिक मोहिमेला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री फवाद शेख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी फवाद शेख म्हणाले की, चांद्रयान-3 चं प्रक्षेपण पाकिस्तानी मीडियानं करायला हवं. तसंच भारताची ही मोहीम मानवजातीसाठी ऐतिहासिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच त्यांनी भारतील वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या.
फवाद शेख यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, पाकिस्तानी मीडियानं चांद्रयानचं चंद्रावर होणारं लँडिंग लाईव्ह दाखवायला हवं. हा एक ऐतिहासिक क्षण असून भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन आणि त्यांना खुप खुप शुभेच्छा. दरम्यान, जगभरातून भारताच्या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.