क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

बाबरचं टेन्शन वाढवलं! भारतासोबतचा पराभव जिव्हारी लावला? पाकचे ‘हे’ खेळाडू तापाने फणफणले

Pakistan Cricket Team World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 मधील भारत पाकिस्तान सामन्यात मायदेशात खेळणाऱ्या भारताने पाकला 7 विकेट्सनी मात दिली. या विजयासोबतच भारताने वनडे वर्ल्डकपमधील पाकिस्तानवरचा आठवा विजय साजरा केला. भारताविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघ निराशेच्या गर्तेत अडकला आहे. त्यात त्यांच्यासाठी अजून एक वाईट बातमी आली आहे.

पाकिस्तान संघातील एक, दोन नाही तर तीन खेळाडू तापाने फणफणले आहेत. अब्दुल्ला शफिक, शाहीन आफ्रिदी आणि उसमा मीर यांना ताप आला आहे. अहमदाबादमध्ये भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ सोमवारी बंगळुरू येथे दाखल झाला. त्यांचा सामना आता बलाढ्य अशा ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणार आहे. मात्र त्याच्या सरावावेळीच संघातील तीन खेळाडू आजारी पडल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

पाकिस्तान संघाचे माध्यम व्यवस्थापक यांनी क्रिकेट पाकिस्तानला सांगितले की, ‘काही खेळाडू गेल्या काही दिवसांपासून तापाने आजारी आहेत. काही खेळाडू पूर्णपणे बरे झाले आहेत. जे अजून बरे झालेले नाहीत ते वैद्यकीय पथाकाच्या देखरेखीखाली आहेत.’

पाकिस्तान संघात तापाची लाटच आली आहे. संघाने डेंग्यू आणि कोरोनाची चाचणी देखील करून घेतली. बंगळुरूमध्ये देखील संघाची सातत्याने डेंग्यू आणि कोरोनाची चाचणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये