इंग्लंडने सामना जिंकताच रचला मोठा विक्रम, क्रिकेट विश्वात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला संघ ठरला!

मेलबर्न : (Pakistan Vs England T-20 World Cup Final Match) मागील महिन्याभरापासून रंगलेला टी-२० विश्वचषक २०२२ क्रिकेट स्पर्धेत इंग्लडने पुन्हा एकदा आपला ठसा उमटला आहे. अंतिम सामन्यात इंग्लड संघाने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंड संघाच्या प्रत्येक खेळाडूने अप्रतिम कामगिरी केल्यामुळं इंग्लंडने एका मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
क्रिकेटच्या इतिहासात एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषक जिंकणारा इंग्लंड हा एकमेव पहिला संघ ठरला आहे. टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंडने ही कामगिरी केली; त्यांनी पूर्वी कर्णधार इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा पराभव करून २०१९ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
इंग्लंडनेही वेस्ट इंडिजप्रमाणे टी-२० विश्वचषकात दोन विजेतेपद पटकावणारा स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा संघ बनला. यापूर्वी संघाने पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखाली २०१० चा टी-२० विश्वचषक जिंकला होता. केविन पीटरसन आणि क्रेग किस्वेटर यांनी एकत्रित भागीदारी करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.