विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त पाकिस्तानी गोलंदाजाचं हटके ट्विट; म्हणाला…
नवी दिल्ली | Virat Kohli Birthday – किंग कोहलीचा (King Kohli) आज (5 नोव्हेंबर) 34वा वाढदिवस आहे. त्यामुळे विराटचे चाहते त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करताना दिसत आहेत. तसंच त्याच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. चाहत्यांसोबतच विराटला अनेक दिग्गजांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच एका पाकिस्तानी गोलंदाजानं ट्विटद्वारे विराटला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे या गोलंदाजाने केलेल्या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज म्हणून ओळखला जाणार शहनवाज दहानी (Shahnawaz Dahani) यांनं विराटला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. शहनवाजनं ट्विट करत म्हटलं आहे की, “विरोट कोहलीनं (Virat Kohli) क्रिकेटला चांगले दिवस आणलेत, अशा व्यक्तीला शुभेच्छा द्यायला मी शनिवारची वाट पाहणार नाही. तुझा दिवस आनंदात जातो, जगाचं असंच मनोरंजन करत रहा”, अशा हटके शुभेच्छा त्याने दिल्या आहेत. सोबत शहनवाज दहानीनं विरोट सोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यानं केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
दरम्यान, विराट कोहलीचं फॅन फाॅलोईंग जबरदस्त आहे. त्यामुळे कोहलीच्या फॅन्सकडून त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा केला जात आहे. ऑस्ट्रेलियात देखील त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. तसंच भारतातही अनेक ठिकाणी विराटच्या चाहत्यांनी पोस्टर लावून, केक कापून किंग कोहलीचा खास दिवस (Virat Kohli Birthday) साजरा केला आहे.