पंढरपूरहून मुंबईला निघालेल्या एसटी बसचा भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
पुणे जिल्ह्यातील यवतजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेली बस झाडावर आदळल्याने ही दुर्घटना घडली असून यामध्ये बसमधील ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- “राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या” ; मनोज जरांगेंची मोठी मागणी
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवतजवळ पुणे- सोलापूर रोडवर आज दुपारी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली बस रस्त्याकडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये जवळपास ३० प्रवासी जखमी झालेत.
हेही वाचा- मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतुला पाच महिन्यातच तडे
महाराष्ट्र परिवहन महामंडळाची ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र पुणे जिल्ह्यातील यवत जवळ असलेल्या सहजपुर गावाच्या हद्दीत या बसला अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की त्यामध्ये बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघातामध्ये जवळपास ३० प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातातील जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.