होणाऱ्या चर्चांवर अखेर पंकजा मुंडेंचे मौन सुटले; म्हणाल्या, माझ्या मनात खदखद…
बीड | देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात हजेरी, ठाकरे गटाकडून शिवसेनेत येण्याची देण्यात आलेली ऑफर आणि यामुळे रंगलेली राजकीय चर्चा यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. पंकजा मुंडे यांनी या प्रश्नावर पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. माझ्या मनात कोणतीही खदखद नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankja Munde) ठाकरे गटात जाण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) गेवराईत एकत्र आले होते. त्यावेळी त्यांना ठाकरे गटाच्या ऑफरबाबत विचारण्यात आले असता पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उत्तर दिलं आहे असे म्हणत त्यांनी सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिलाय.
मी भाजपची सच्ची कार्यकर्ती, माझ्या मनात कुठलीही खदखद नाही
माझ्या मनात कोणतीही खदखद नाही, त्यामुळे माझ्या मनात खदखद आहे अशा बातम्या लावण्याचं कारण नाही. फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमात मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी आले नाही. आज प्रदेशाध्यक्ष आले म्हणून मी आले. जेपी नड्डा आले मी आले. मी भाजपच्या संस्कारात वाढलेली, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते. पण कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाच्याबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.