महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाल्या, सत्तेचा गैरवापर करून….

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं गेल्या ९ दिवसांपासून वडीगोद्री इथं उपोषण सुरू आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर या शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन उदय सामंत आणि अतुल सावे हे मुंबईला जाणार आहे. त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ देखील असणार आहे. ओबीसी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे यांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान, सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना भेटून गेल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सत्तेचा गैरवापर करून चुकीची सर्टिफिकेट दिली आहेत का? त्याची चौकशी करावी आणि राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट घ्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केलीय.

राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी या दोन मागण्या असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

हेही वाचा- लोकसभा झाली, आता विधानसभा! निवडणूक आयोगानं जारी केली महत्त्वाची माहिती


महायुतीत अजितदादा एकटे? भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का, शिंदेंच्या सेनेला झुकतं माप

ओबीसींच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग‘हाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास असल्याचंही पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर म्हटलंय.

हेही वाचा- “गुजरातचे सोमेगोमे शिवसेनेला संपवू शकत नाही”; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

सरकारच्या शिष्टमंडळात राज्याचे मंत्री गिरीश महाजन हेसुद्धा होते. त्यांनी आज मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसींच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिल्याचं म्हटलंय. या भेटीत ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा होईल आणि त्यात निर्णय घेतला जाईल असं गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्यानंतर सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये