लग्नात हार घालताच निसटली पॅन्ट; नवरदेवाची उडाली तारांबळ व्हिडीओ तुफान व्हायरल

सोशल मीडियावर या ना त्या कारणाने अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्यातीलच एका व्हिडीओनं सध्या इन्स्टाग्रामवर तुफान धुमाकुळ घातली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाहीत. एका लग्न सोहळ्यातील हा व्हायरल झालेला व्हिडीओ आहे. लग्नाच्या काही विधी पुर्ण करत असताना, शेवटचा विधी चालू होता. या दरम्यान, हार घालत असताना अचानक नवरदेवाची पॅन्ट निसटली यामुळं त्याची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळं हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, अचानक असा काही प्रकार घडला की, लग्न समारंभात सहभागी झालेल्या मंडळ्यांना देखील हसू अवरले नाही. bhutni_ke_memes या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, तो सोशल मिडीयावर तुफान झाला आहे. तुफान व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहायला विसरु नका.

Prakash Harale: