शेतकऱ्यांची थट्टा! विमा कंपनीकडून विमा स्वरुपात पावणेदोन रुपयांची मदत! शेतकरी आक्रमक…

परभणी : (Parbhani Formers Crop Insurance Company) सध्या सर्व बाजूने शेतकऱ्यांची थट्टा मांडल्याचे दिसून येत आहे. पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेलं अन् हातातोंडाशी आलेलं पिक परतीच्या पावसामुध्ये डोळ्यासमोर मातीत मिसळलं. त्यांतर शिंदे-फडणवीस सरकराने मोठ्या थाटात शेतकरी मदतीची घोषणा केली. मदतीच्या अपेक्षाने व्याकूळ झालेला बळीराजा, सरकार मायबाप काही तर मदत करेल असं वाटत असताना तोंच्याकडूनही शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसण्याचे काम शिंदे-फडणवीस यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. उरली सुरली आशा भरलेल्या हक्काच्या पिक विम्याकडे होती. मात्र, परभणी जिल्ह्यातील विमा कंपनीने तर अतिवृष्टीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा स्वरुपात पावणेदोन रुपयांची मदत केल्याने, कपाळाला हात लावून बसण्याची वेळ आज उभ्या जगाचा पोशिंदा म्हणवणाऱ्या शेतकऱ्यावर आली आहे.
परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात यंदा अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यांना पीक विमा रक्कम वाटप सुरुवात झाली आहे. मात्र पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा करण्यात येते. कुणाला 1 रुपया 70 पैसे, कुणाला 74 रुपये, कुणाला दोनशे रुपये अशाप्रकारे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. शेतकऱ्यांनी पीक विम्याची एवढी रक्कम घेऊन करायचं काय? असा प्रश्न उपस्थित करत शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत. आता तरी सरकार जागे होऊन, विमा कंपन्यांना आळा घालणार का? की अशाच प्रकारचा मनमानी कारभार करण्यासाठी मोकाट सोडले जाणार हे पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.
परभणी जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात आयसीआयसीआय लोंबर्ड कंपनीकडे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल 6 लाख 71 हजार 573 शेतकऱ्यांनी 48 कोटी 25 लाखांचा विमा भरला होता. ज्यातून 4 लाख 38 हजार 812 हेक्टर एवढे पीक क्षेत्र संरक्षित केले होते. यात अतिवृष्टी झाल्याने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, कापूस, तूर आधी पिकांचे नुकसान झालं. या पार्श्वभुमीवर शासनाच्या मदतीसाठी असेल किंवा मग पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन केले मात्र त्याचा उपयोग अशा प्रकारे होईल असं त्यांना कधीन वाटलं नसेल.