देश - विदेश

उद्यापासून संसदेचे अधिवेशन होणार सुरू ; पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी २८० खासदारांसह घेणार शपथ

१८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री खासदार म्हणून सर्वप्रथम शपथ घेणार आहेत.  प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब त्यांना शपथ देतील. यानंतर नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाईल. पंतप्रधान मोदींनंतर राजनाथ सिंह, अमित शहा आणि नितीन गडकरी शपथ घेणार आहेत. त्यानंतर मंत्री परिषदेचे इतर सदस्य खासदार म्हणून
शपथ घेतील.

पीएम मोदींच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये ५८ लोकसभेचे सदस्य आहेत. केंद्रीय मंत्रिपरिषदेचे 13 सदस्य राज्यसभेचे खासदार आहेत. एक मंत्री, रवनीत सिंग बिट्टू हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. लुधियानामधून त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. पीएम मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनंतर राज्यनिहाय खासदारांना इंग्रजी अक्षरानुसार शपथ दिली जाईल. संसदेच्या या अधिवेशनात
शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास असणार नाही.

हेही वाचा- “मोदी सरकारचं लीकतंत्र तरुणांसाठी घातक”; युजीसी नेट परीक्षेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

आधी आसामचे खासदार आणि शेवटी पश्चिम बंगालचे खासदार शपथ घेतील. २४ जून रोजी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २८० नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ जून रोजी २६४ नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. त्यानंतर २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. २७ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. २८ जून रोजी, सरकार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यात दुसरीकडे नुकत्याच झालेल्या NEET पेपर लीकवरून विरोधक गोंधळ निर्माण करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-पंजाब नॅशनल बँकेतील ’ही’ खाती आता होणार बंद; बँकेची ग्राहकांना नोटीस

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलै रोजी लोकसभेला संबोधित करणार आहेत. ते ३ जुलै रोजी राज्यसभेत बोलणार आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी २० जून रोजी सांगितले होते की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कटक, ओडिशा येथील भाजप खासदार भर्त्रीहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे. अध्यक्षांनी सुरेश कोडीकुन्नील, थलिकोट्टई राजुतेवर बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांना अध्यक्ष निवडीपर्यंत प्रोटेम स्पीकरला मदत करण्यासाठी नियुक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये