ताज्या बातम्यापुणे

संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेच्या मदतीसाठी असीम सरोदे पुढे सरसावले; म्हणाले..

पुणे | हिवाळी अधिवेशन सुरु असलेल्या संसदेत बुधवारी दोन जणांनी घुसखोरी केली होती. या दोघांनी लोकसभेच्या मुख्य सभागृहात धुराची नळकांडी फोडून एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचवेळी संसदेबाहेर त्यांच्या दोन साथीदारांनी स्मोक बॉम्ब फोडून घोषणाबाजी केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील अमोल धनराज शिंदे या तरुणाचा समावेश होता. बेरोजगारीमुळे अमोल व त्याच्या साथीदारांनी लोकसभेत घुसून प्रतिकात्मक आंदोलन करण्याची योजना आखली व तडीस नेली, असे सांगितले जाते. या सगळ्या घटनाक्रमानंतर पोलिसांनी अमोल शिंदेला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता वकील असीम सरोदे यांनी अमोलला कायदेशीर मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

बुधवारी दुपारी या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. वकील असीम सरोदे हे अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार असून त्याची बाजू ते कोर्टात मांडणार आहेत. यासंदर्भात सरोदे यांनी फेसबुक पोस्ट लिहित माहिती दिली आहे.

सरोदेंनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं ?

“अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत, ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोलचा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी, असे मला वाटते”, असे सरोदेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये