पुणेसिटी अपडेट्स

सोया फेड मेनूसाठी १०० रेस्टॉरंट्सशी भागीदारी

आमच्या सर्व ग्राहकांना सर्वात पौष्टिक अन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत आलो आहोत. या मेनूद्वारे उच्च दर्जाच्या प्रोिटनवरील त्यांच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना मदत करण्याच्या दिशेने आम्ही एक पाऊल पुढे गेलो आहोत! या जागरूकतेच्या चळवळीत सहभागी होण्याचा आम्हाला आनंदच आहे.

गुरमीत कोचर
ओयेकिड्डनचे मालक

पुणे ः सोयाबीनयुक्त जेवण हे पशुधन, कुक्कुटपालन आणि जलचर प्राणी यांच्या आहारातील प्रथिनांचे प्रमुख प्रथिने स्रोत आहे. त्यातून संतुलित अमीनो अ‍ॅसिड प्रोफाइल आणि वनस्पती-आधारित प्रथिनांच्या स्रोतांमध्ये उच्च पातळीची पचनक्षमता मिळते. सोयाबीनच्या जेवणातील परिपूर्ण पौष्टिक मूल्यांमुळे प्राण्यांचे आरोग्य कायम राहण्यास मदत मिळते. त्यामुळे प्राण्यांच्या प्रथिने उत्पादनांसाठी भारतातील पहिले स्वैच्छिक फीड लेबल असलेल्या सोया फेड लेबल इंडियाच्या सादरीकरणानंतर देशभरातील स्टॉरंट्ससह सोया फेड मेनू हा ग्राहकांना दर्जेदार प्रथिने ओळखण्यासाठी आणि निवडण्याच्या दिशेने राइट टू प्रोटिनचे एक क्रांतिकारक पुढचे पाऊल ठरणार आहे.

याचे प्रमुख कारण म्हणजे प्रथिनांचा अधिकार (राईट टू प्रोटिन) देशव्यापी सार्वजनिक आरोग्य उपक्रमांतर्गत १०० हून अधिक स्टॉरंट्स सहकार्य करून उच्च दर्जाच्या पोल्ट्रीपासून बनवलेले पदार्थ पुरवत आहे. भारतातील १५ शहरांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांत ओयेकिड्डन, सुपर बाऊल, बर्ग्रिल, सरदाजी लंडनवाले, पंजाबी नवाबी, फार्महाऊस यांसारख्या स्टॉरंट चेन कस्टमाईज्ड सोया फेड मेनू तयार करण्यात येणार आहे. झोमॅटो आणि स्विगी यांसारख्या आघाडीच्या फूड ऑर्डरिंग अ‍ॅप्सवरदेखील हे पदार्थ उपलब्ध होणार आहेत. उच्च दर्जाच्या प्रथिनयुक्त अन्नपदार्थांबद्दल ग्राहकांना जागरूक करणे या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यूएस सोयाबीन एक्स्पोर्ट कौन्सिल इंडियाचे प्रमुख आणि राईट टू प्रोटिनचे समर्थक जेसन जॉन म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये