सिटी अपडेट्स

केबीसी मराठीच्या प्रेक्षकांसाठी ‘सुधा मूर्ती’रुपी पर्वणी

समृद्ध करणारा अनुभव देणारा विशेष भाग…
’कोण होणार करोडपती’ या खेळासाठी सुधा मूर्ती यांनी खास छत्रपती शिवाजीमहाराजांच्या घराण्यातून भेट म्हणून मिळालेली, राजमातांनी दिलेली साडी परिधान केली आहे. लहानपणीच्या आठवणी, संस्कार, एकटी मुलगी म्हणून इंजिनिअरिंग करताना आलेले अनुभव, टाटा यांच्याबरोबर काम करीत असतानाचा समृद्ध अनुभव अशा विविधांगी रंजक गोष्टींनी हा विशेष भाग रंगणार आहे.

पुणे : ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर दुसर्‍या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून आपल्या महाराष्ट्राची कन्या सुधा मूर्ती सहभागी होणार आहेत. मागच्या आठवड्यात सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू झाले. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती उपस्थित राहणार आहेत.

इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.
‘साधी राहणी, उच्च विचार’ ही उक्ती तंतोतंत पाळणार्‍या सुधा मूर्ती ‘कोण होणार करोडपती’च्या खेळात येत्या शनिवारच्या भागात सहभागी होणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या याही पर्वात दर आठवड्यातील शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत.

समाजाच्या कल्याणासाठी झटणार्‍या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुधा मूर्ती या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील
‘श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ’ या शाळेसाठी खेळल्या. शालेय शिक्षणाबद्दल असलेल्या आस्थेपोटी सुधा मूर्ती ‘कोण होणार करोडपती’ हा
खेळ खेळल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये