ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रशेत -शिवार

बेजबाबदार ऊस वाहतुकीमुळे प्रवाशांना होतोय नाहक त्रास! पहा व्हिडीओ

भिगवण – PUNE RURAL NEWS : राज्यात सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू झाला आहे. इंदापूर तालुक्यात ऊसाचे मोठे आगार असल्याने इंदापूर तालुक्यातील स्थानिक साखर कारखान्यांसह आजूबाजूच्या परिसरातील साखर काराखान्यांना देखील इंदापूर तालुक्यातून ऊसाचा पुरवठा होत असतो. मात्र सध्या भिगवण परिसरातून ऊस वाहतुकदारांकडून केली जाणारी ऊसाची वाहतूक ही धोकादायक पध्दतीने केली जात असून वाहतुकीच्या नियामाचे उल्लंघन होताना दिसून येत आहे.अशा नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या वाहनांवर परिवहन प्राधिकरण कार्यालयाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नारिकांनी केली आहे.

भिगवण शेटफळगडे मार्गावर वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करुन क्षमतेपेक्षा अधिक बोजा घेऊन वाहतूक केली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियात वायरल झाला आहे. यात दोन ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांत स्पर्धा लागल्याचं दिसून येतंय.

भिगवण हे तीन जिल्ह्याचे सेंटर पॉइंट असल्यामुळे भिगव‌‌णच्या सभोवताली ४० किलोमीटरच्या सर्कलमध्ये ८ साखर कारखाने आहेत. यामुळे कारखान्याची जास्त ऊस वाहतूक भिगवण भागातून ऊस पुरवठा ट्रॅक्टर ट्राॅलीच्या माध्यामातून केला जात असते मर्यादेपक्षा अधिक ऊस ट्राॅलीत भरुन वाहतूक केली जाते. एका मागे एक असे एक दोन नव्हे तर पाच सहा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रस्त्याने रेल्वेगाडीच्या डब्यांसारखी लाईन लावतात. त्यामध्ये शिस्तीने वाहतूक न करता जीवघेणा बोजा घेऊन ओव्हर टेक चे वारंवार प्रयत्न केले जातात. त्यामुळे इतर वाहन चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतोय.

यामुळे या अगोदर अनेक प्रवाशाचा रोडवर नाहक जीव गेला आहे. वाहतुकीचे नियम हे सर्वसामान्य साठी वेगळे व ठराविक मोठ्या व्यवसायसाठी वेगळे असल्याचे निदर्शनास येत आहे. ट्रॅक्टर वाहतूक दर यांना ओव्हरटेक न करता दोन ट्रॅक्टर मध्ये ठराविक अंतर ठेवणे, रिप्लेक्टेड, वाहतूक लोड मर्यादा आशा नियमावलीची संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई व नवीन उपाययोजनेची प्रतिक्षा प्रवासी अपेक्षा करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये