ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईसिटी अपडेट्स

“48 तासांच्या आत 1 मिलियन डॉलर्स द्या नाहीतर…”, मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई | Mumbai Airport : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईचं (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) बॉम्बने उडवण्याची धमकी (Threat) दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे.

मेलद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेल पाठवण्याऱ्या व्यक्तीनं धमकी देत हा स्फोट थांबवण्यासाठी 48 तासांच्या आत 1 मिलियन डॉलर्स देण्याची मागणी केली आहे. तसंच हे डॉलर्स बिटकॉइनमध्ये त्यानं मागितले आहेत.

आरोपीनं धमकीच्या मेलमध्ये म्हटलं आहे की, तुमच्या विमानतळासाठी अंतिम चेतावणी आहे. जर सांगितलेल्या माहिती प्रमाणे झालं नाही तर आम्ही विमानतळाच्या टर्मिनल 2 वर 48 तासांच्या आत बॉम्बस्फोट करू. आम्हाला 1 मिलियन डॉलर्स बिटकॉइनमध्ये पाठवा.

धक्कादायक बाब म्हणजे 24 तासांच्या आत आरोपीनं धमकीचे दोन मेल केल्याची माहिती समोर आली आहे. तर एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सहार पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या व्यक्तीनं quaidacasrol@gmail.com हा ईमेल आयडी वापरून धमकीचा मेल पाठवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये