क्राईमताज्या बातम्यापुणे
भीमाशंकर मंदिराच्या गाभाऱ्यात, पुजाऱ्यांच्या दोन गटात फिल्मी स्टाईल राडा; व्हिडीओ व्हायरल..
Pimpri-Bhimashankar Mandir News : पिंपरीच्या भीमाशंकर मंदिरात धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरात पुजाऱ्यांच्या दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. पुजाऱ्यांच्या दोन गटात झालेल्या या हाणामारीत लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला.
मंदिरातील पुजेदरम्यान मान-अपमानामुळे ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दोन गटात पुजा करण्यावरुन वाद निर्माण झाला होता.
पुजाऱ्यांमध्ये झालेल्या या वादाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
https://www.instagram.com/reel/CygAL6LBoUv/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==