आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त चार हजार आठशे झाडांचे रोपण

यवत : आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी एनएचएआय प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्या वतीने संत तुकाराममहाराज पालखी मार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस, रोटी, हिंगणीगाडा आणि वासुंदेदरम्यान तब्बल ४ हजार ८०० झाडांचे एका दिवसांत रोपण करण्यात आले.
संत तुकाराममहाराज पालखी मार्गाचे रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभरात देशभर १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ७५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई कार्यालयाच्या जीएम रंजिता प्रसाद, प्रकल्प संचालक केशव घोडके, व्यवस्थापक इंद्रकुमार नारायणकर, रोपण व्यवस्थापक आकाश राळेभात, मुख्य व्यवस्थापक आणि प्रादेशिक अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, अशोककुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम झाला.