पिंपरी चिंचवड

चऱ्होलील तनिष्क पार्क येथे ‘पीएमपीएमएल’ बस थांबा

भोसरी विधानसभा मतदार संघातील चऱ्होली गाव मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. येथील तनिष्क पार्क सोसायटी आणि प्राईड सोसायटीपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून, भविष्यात पिंपरी-चिंचवडचा हा ‘एन्ट्री पॉईंट’ राहणार आहे. त्यामुळे या भागात पीएमपी बस सुविधा सुरू करण्याबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आणि प्रत्यक्षात बससेवा सुरू करण्यात आली आहे.

तनिष्क पार्क बस सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, यश पवार, संदेश बडिगेर आणि सोसायटीतील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते बसला ‘ग्रीन सिग्नल’ दाखवण्यात आला. यावेळी अरुणा जाधव आणि स्मिता दळवी यांनी औक्षण केले.

बससेवेसाठी राजकारणापलिकडचे असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे आमदार महेश लांडगे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. ‘जे काम हाती घ्यायचे ते पुर्णत्वास न्यायचे’ यात दादांचा हातखंडा असल्याने हे कार्यसुद्धा त्यांनी तत्परतेने पूर्ण केले. याबद्दल त्यांचे विशेष धन्यवाद आहेत. चऱ्होली आणि परिसरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा सक्षम करण्याबाबत बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे, अशा भावना सोसायटीतील सदस्यांनी व्यक्त केल्या.

प्रवाशांची गैरसोय झाली दूर…

तनिष्क पार्क सोसायटी आणि प्राईड सोसायटी चऱ्होली या ठिकाणाहून महिला, विद्यार्थी व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात प्रवास करीत आहेत. मात्र, या सध्या या ठिकाणी बस सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच, भविष्यात हा परिसर शहरात प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून उदयास येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा या ठिकाणी निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पीएमपी बस सुरू केल्यामुळे सर्वसामान्य प्रवशांना फायदा होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये २०१७ पासून आम्ही विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पायाभूत सोयी-सुविधा आणि विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारल्यामुळे या भागात चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर निर्माण झाला आहे. लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा त्या तुलनेत उपलब्ध करणे काळाची गरज आहे. पीएमपीएमएल प्रशासनासोबत समन्वय करुन तनिष्क पार्क सोसायटीपर्यंत बस सेवा सुरू करण्यात यश मिळाले, याचे समाधान वाटते. – महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये