पीएमटी चालक आणि दुचाकीस्वार तरुणांत जंगी हाणामारी; पुणे स्टेशन परिसरातील घटना, पहा व्हिडीओ

पुणे : PMPML Driver- पुण्यात अनेकदा पीएमटीक (PMPML) चालक आणि इतर वाहनचालकांत शिवीगाळ झाल्याच्या घटना घडतात. आज देखील एक धक्कादायक प्रकार पुण्यातील पुणे स्टेशन परिसरात घडला आहे. पीएमटी चालक आणि एक दुचाकी स्वार तरुणांत चपला आणि लाथा-बुक्क्यांनी हाणामारीझाली आहे. या घटनेने पुण्यात एकूणच खळबळ उडाली आहे. ड्रायव्हर आणि दुचाकीस्वार या दोघांनीही एकमेकांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. Letest Pune City News
सदर घटना रविवारची आहे. स्वारगेट वरून सुसाट पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या पीएमटीसमोर एक दुचाकी आली. पीएमटीच्या चालकाने त्यांना बाजूला हटण्यास सांगितले. दरम्यान त्यांच्यात सुरुवातीला एकमेकांची चूक काढत शाब्दिक बाचाबाची झाली. काही क्षणातच याचे मोठ्या वादात रूपांतर झाले. अशी माहिती आहे. दुचाकी स्वराने ड्रायव्हरजवळ जाऊन त्याला चप्पल मारली आणि गळा देखील धरल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ड्रायव्हरने देखील त्याला जशास तसे उत्तर दिले आहे. दरम्यान, या दोघांच्या मारामारीत कंडक्टरने देखील दुचाकी स्वाराला मारले. काही नागरिकांनी मध्यस्ती करून भांडण थांबवले.