देश - विदेश

दिवाळीच्या मुहूर्तावर पीएमपीकडून कामगारांना मोठं गिफ्ट! विविध भागातून बससेवा सुरू होणार

पुणे | दिवाळीच्या मुहूर्तावर पीएमपी (PMPML) प्रशासनाकडून कामगार वर्गाला मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातून भोसरी आणि चाकण येथील एमआयडीसीतील कंपन्यामध्ये कामासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या कामगारांसह अन्य प्रवाशांना सुरक्षित आणि जलद सेवा देण्यासाठी पीएमपीकडून शहरातील 49 मार्गावरून बससेवा उपलब्ध असून, प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशसनाकडून करण्यात आले.

भोसरी एम.आय.डी.सी.त जाण्यासाठी पुणे मनपा भवन, पुणे स्टेशन, हडपसर, कात्रज, वारजे माळवाडी, निगडी, चिंचवड गाव, पिंपरी, आळंदी व सांगवी या बसस्थानकांवरून दिवसभरात 241 बसद्वारे 39 मार्गांवर 2 हजार 654 फेऱ्यांच्या माध्यमातून सेवा दिली जाते. तर चाकण एम.आय.डी.सी.साठी भोसरी, निगडी, पिंपळे गुरव, तळेगांव दाभाडे, राजगुरूनगर आणि आळंदी या बसस्थानकांवरून दिवसभरात 67 बसद्वारे 10 मार्गांवर 756 फेऱ्या होतात. त्यामुळे प्रवाशांना शहराच्या कानाकोपऱ्यातून भोसरी आणि चाकण येथील एमआयडीसीत जाणे शक्य आहे.

दरम्यान, पुणे मनपा ते भोसरी या अंतरात विनावाहक बससेवाही सुरू केली असून, त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन भोसरी येथून एमआयडीसीत जाणे सोपे झाले आहे. तसेच मासुळकर कॉलनीसाठीची पिंपरीगांव ते आळंदी, पुणे स्टेशन ते पिंपरीगांव, मनपा भवन ते पिंपरीगांव आणि निगडी ते नाशिक फाटा ही बससेवा उपलब्ध असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये