पुणे
सिंहगडावर प्रवाशांना ३ तास पीएमटीची वाट बघावी लागतेय; चार्जिंग होतच नाही

पुणे : सिंहगडावर जाण्यासाठी वनविभाग आणि पीएपीकडून इलेक्ट्रिक बसेसची सोय करण्यात आली आहे. मात्र बसेस वेळेवर चार्ज होत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तिन तास प्रवासी काल बस ची वाट बघत थांबले होते. त्यामुळे मनस्तापाचे वातावरण आहे. सिंहगडावर बस साठी चार्जिंग स्टेशन आहे मात्र बस चार्जिंग होण्यासाठी खूप वेळ लागतो. काल रविवारी लोकांची मोठ्या प्रमाणात सिंहगडावर संख्या होती. रात्री उशिरापर्यंत त्यांना बस ची वाट बघत राहावे लागले.