
पुणे : कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानन्तर हॉटेल,पब, बार यांना रात्री साडेअकरा ते बारा पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र शहरातील अनेक हॉटेल त्यापुढेही सुरूच असतात. पुण्यातील कोंढवा आणि कल्याणीनगर भागात रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या हॉटेल्स आणि बार सोबतच बेकायदा हुक्का पार्लर्सवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यात काही हॉटेल चालकांवर खटले देखील दाखल करण्यात आले आहेत. आणि एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घालुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरातील नागरिकांच्या तक्रारींनंतर पोलिसांनी केलेल्या पाहणीत मुंढवा परिसरातील वॉटस बार, कोंढवा परिसरातील रुफटॉप व्हिलेज, द अजांत जॅक्स ही हॉटेल मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.
काही हॉटेल्सच्याबाहेर व निवासी भागात रात्री उशिरापर्यंत तरुण-तरुणींकडून मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला जात असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यांनतर पोलिसांनी कारवाई करण्याला सुरुवात केली आणि रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल आणि बारवर कारवाई केली. मात्र अजूनही बऱ्याच ठिकाणी रात्री उशिरापर्यंत बार हुक्का पार्लर सुरु राहत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आलेल्या आएह्तआहेत.