राज्यात पोलीस भरतीला सुरुवात; तब्बल १७ हजारपेक्षा अधिक जागा भरणार
राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, इच्छुक उमेदवारांकडून अर्जही करण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल १७,४७१ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलीस शिपाई या पदासाठी आले आहेत.
हेही वाचा- “जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका…” मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन
राज्यातील गृह विभागात विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यात तुरुंग विभागातील शिपाई पदाच्या एका जागेमागे सुमारे २०७ उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदासाठी १८०० जागा असून, तब्बल ३ लाख ७२ हजार ३५४ अर्ज आले आहेत. चालकपदासाठी १६८६ जागा उपलब्ध असून, त्यासाठी १ लाख ९८ हजार ३०० अर्ज आले आहेत. यात सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलीस शिपाई पदासाठी आहेत.
हेही वाचा– राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार जोरदार सरी
पोलिस शिपाई या ९५९५ जागांसाठी ८ लाख २२ हजार ९८४ अर्ज आले असून एका जागेसाठी साधारण ८६ उमेदवार असे याचे गुणोत्तर आहे. शीघ्र कृती दलातील ४ हजार ३४९ जागांसाठी ३ लाख ५० हजार ५९२ अर्ज (एका जागेसाठी ८० उमेदवार) आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या ६६ जागांसाठी तब्बल आठ हजार ८९४ अर्ज दाखल झाले आहेत. प्रत्यक्षात मैदानी चाचणीला बुधवारी सुरूवात होणार आहे. पोलीस शिपाई संवर्गातील ४५ पदांची व पोलीस शिपाई चालक संवर्गातील २१ पदांची भरती प्रक्रिया बुधवारपासून सुरू होईल.