ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने घेणार नाही’- देवेंद्र फडणवीस

मुंबई | Devendra Fadnavis – पोलीस भरती कंत्राटी स्वरूपाची करण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यानंतर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर निशाणा साधला. या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळामध्ये निवेदन दिले. हे आपण तात्पुरते घेत आहोत, ही काही परमनंट अरेंजमेंट नाहीये, असे फडणवीस म्हणाले आहेत.

“राज्य सरकारचेच महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या जवानांना विविध केंद्र व राज्य शासकीय कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठान, सार्वजनिक ठिकाणे इत्यादी करता यापूर्वीही सुरक्षा नियमितपणे वापरली गेली आणि वापरली जात आहे. त्यामुळे कुठेही कंत्राटी पद्धतीने भरती घेत नसल्याचे फडणवीस म्हणाले. कंत्राटी भरतीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. सरकारने यावर निवेदन करण्याचे निर्देश उपसभापतींनी दिले होते. या निर्देशानुसार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन देऊन ही भरती कंत्राटी पद्धतीने नसून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातून भरती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातून भरण्यात येणाऱ्या या तीन हजार कर्मचाऱ्यांना केवळ सुरक्षाविषयक कामकाज, गार्डविषयक कर्तव्याची कामे देण्यात येणार असून, कायदेविषयक अंमलबजावणीचे काम देण्यात येणार नाही.
— देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये