क्राईम
पूजा खेडकरच्या वडिलांवर पुण्यात गुन्हा दाखल !
पुणे येथे पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप खेडकर यांच्याविरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार बुधवारी बंडगार्डन पोलिसांकडे देण्यात आली होती. पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूजाला स्वतंत्र केबिन द्यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता.