महाराष्ट्र

युपीएससीने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर ‘नॉट रिचेबल’

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळवणुकीची तक्रार करणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर नॉट रिचेबल आहेत. पुणेपोलिसांनी दोनवेळा समन्स देऊनही त्या आयुक्तालयात जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहिल्या नाहीत. याबाबत पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पूजा खेडकरविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीने त्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा पोलिस दलात आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती असताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी छळ केल्याची तक्रार मागील आठवड्यात वाशिम पोलिसांकडे केली होती. हा प्रकार पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील असल्यामुळे ही तक्रार वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली. यानंतर पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दोन वेळा समन्स पाठवला होता. मात्र, दोन्ही समन्सनंतरही त्या अनुपस्थित राहिल्या. यानंतर पुणे पोलिसांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. तसेच त्यांना व्हॉट्सॲपवरून केलेला मेसेज देखील पोहोचत नसल्याने, नेमक्या खेडकर आहेत कुठे? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

दिल्लीत गुन्हा

1. दुसरीकडे पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीच्या वतीने दिल्लीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2. नोटीस बजावून कागदपत्रांच्या घोळाबाबत स्पष्टीकरणही मागितले आहे. उमेदवारी रद्द का करू नये, अशी विचारणा करत उमेदवारी रद्द करण्याबाबत नोटीस जारी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये