पुण्याच्या जिल्हाधिकारी विरोधात तक्रार प्रकरणी पूजा खेडकर यांचा उद्या जबाब नोंदवला जाणार
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधातील तक्रार प्रकरणी पुणे पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलेले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की,पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशीम पोलिसांकडे दाखल केली आहे. ती तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुजा खेडकर यांचा नव्याने जबाब नोंदवायचे ठरवले आहे.
त्यासाठी पुजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी उद्या (दि.१८) जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. पुणे पोलिस दलातील महिला अधिकारी पुजा खेडकर यांचा जबाब नोंदवणार आहेत. त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीबाबत काय करायचं, याचा निर्णय घेण्यात येणार आहे.