नितीन देसाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन, मृत्यूचं कारण झालं स्पष्ट
मुंबई | Nitin Desai Suicide – कला दिग्दर्शन नितीन देसाई (Nitin Desai) यांनी काल (2 ऑगस्ट) आत्महत्या करत स्वत:चं जीवन संपवलं. त्यांनी त्यांच्या कर्जतमधील एन.डी.स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांचं फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर मराठी सिनेसृष्टीतही मोठं नाव होतं. दरम्यान, आता देसाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं असून त्यांच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे.
नितीन देसाई यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम बुधवारी जेजे रूग्णालयात करण्यात आलं. यावेळी प्राथमिक निष्कर्षामध्ये त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. नितीन देसाई यांचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचा रायगड पोलिसांनी सांगितलं.
रायगड पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, नितीन देसाई यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन चार डॉक्टरांच्या पथकानं केलं. यामध्ये प्राथमिक निष्कर्षानुसार त्यांचा मृत्यू फाशीमुळे झाला आहे. तसंच सध्या पुढील तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.