राष्ट्रसंचार कनेक्ट

निवडणूक स्थगित; मात्र आचारसंहिता कायम

राजगुरुनगर : सध्या आपल्या देशात केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कणखर नेतृत्वाखाली मजबूत सरकार अत्यंत उत्कृष्ट काम करीत आहे, त्याचप्रमाणे नुकतेच राज्यातील सत्तेमध्येही परिवर्तन झालेले आहे. या सर्व गोष्टी आपल्या पक्षकार्यासाठी अनुकूल असल्या तरीही कार्यकर्त्यांनी सतर्क राहून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून जनतेशी सतत संपर्कात राहावे, असे आवाहन माजी मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वालचंदनगर कळस व सणसर, लासुर्णे या दोन गटांतील पक्ष कार्यकर्त्यांची संवाद बैठक रविवारी (दि. १७) सायंकाळी येथील बळीराजा सांस्कृतिक भवनात आयोजिण्यत आली होती. त्या वेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने कशा रीतीने राजकीय डावपेच आखत महाविकास आघाडीवर मात केली आणि यश मिळवले, याची माहिती देऊन ते म्हणाले की, केंद्र सरकारच्यावतीने जनतेच्या हितासाठी सध्या अनेक योजना राबविल्या जात आहेत, त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, आरोग्याच्या योजना, कोरोनाप्रतिबंधक लसीकरण योजना, मोफत धान्य योजना अशा अनेक योजना आहेत. या योजनांची कार्यकर्त्यांनी व्यवस्थित माहिती घेऊन त्यांचे लाभार्थी कोण कोण आहेत, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना भारतीय जनता पक्षाशी जोडण्याचे काम कार्यकर्त्यांनी झटून करायलाच हवे! महाराष्ट्रात आता सत्ताबदल झालेला आहे. नवे सरकार आलेले आहे, हे आपल्या दृष्टीने फायद्याची गोष्ट आहे. राज्यातील या परिवर्तनामुळे आता इंदापूर तालुक्यामधील जनता ही भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, टक्केवारीमुक्त राजकीय वातावरणाचा अनुभव घेईल!

या संवाद बैठकीचे प्रास्ताविक दयानंद झेंडे यांनी केले. संजय नकाते यांनी वालचंदनगर येथील कामगार व कंपनी क्षेत्रातील परिस्थितीची माहिती दिली व यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी लक्ष घालून कंपनीची व कामगारांची स्थिती सुधारावी, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शरद जामदार यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या संवाद बैठकीसाठी कळस – वालचंदनगर, सणसर – लासुर्णे या जिल्हा परिषद गटातील सर्वश्री विलासराव माने विलास वाघमोडे, अ‍ॅड. नरुटे, प्रदीप पाटील, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार वालचंदनगरचे सरपंच कुमार गायकवाड, सत्यशील पाटील, अंकुश रणमोडे, तुकाराम काळे आदी मान्यवर व विविध क्षेत्रांत काम करणारे कार्यकर्ते नेते उपस्थित होते. येथील वालचंदनगर सहकारी बँकेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये भारतीय मजदूर संघ पुरस्कृत स्वाभिमानी पॅनलने एकूण बारा जागांपैकी सर्वच्या सर्व जागा जिंकून बारा शून्य असा दणदणीत विजय मिळविला, त्याबद्दल सर्व विजयी संचालकांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये