पुणे

पुण्यातील खड्डे जीवघेणे !

दुचाकी घसरून अपघात वाढले; दुखापतीच्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांची वाढ

शहरातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यातच हे खड्डे भर पावसात बुजविल्याने रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांत अनेक जणांना गंभीर दुखापत होत आहे. अशा रुग्णांची संख्या आठवडाभरात २० टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

शहरात पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडले. या खड्ड्यांत दुचाकी आदळून अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रामुख्याने दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहे. त्यामुळे अनेकांना हाड मोडणे, मणक्याला दुखापत अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच पाऊस सुरू असताना खड्डे बुजविण्याची मलमपट्टी करण्यात आल्याने आता ते पुन्हा उखडले आहेत. त्यातील खडी रस्त्यावर पसरून दुचाकी घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये