ताज्या बातम्या

‘शरद पवार पंतप्रधान व्हावे ही आमची ईच्छा होती, पण..’ प्रफुल्ल पटेलांनी ठेवलं दुखऱ्या नसेवर बोट

मुंबई : (Praful Patel On Sharad Pawar) शरद पवार पंतप्रधान व्हावे ही आमची ईच्छा होती, असं अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ”पी.व्ही. नरसिंह राव यांना हटवण्यासाठी आम्ही पुर्णपणे प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी राव यांनी सीताराम केसरी यांना काँग्रेसचं अध्यक्ष केलं. सहा महिने पूर्ण होतं नाहीत, तोच केसरी यांनी देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. 145 पेक्षा जास्त खासदार शरद पवार यांच्या घरी आले सर्वणी विनंती केली तुम्ही केसरी यांना हटवा.”

ते पुढे म्हणाले की, ”त्यावेळी मला देवेगौडा यांचा फोन आला. मी देवेगौडा यांच्या घरी गेलो, ते म्हणाले मी राजीनामा देतो. फक्त केसरीला हटवा आणि शरद पवार यांनी भूमीका घ्यावी (पंतप्रधानपदाची).” माध्यमांशी बोलताना ते असंम्हणाले आहेत.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ”मी शरद पवार यांना जाऊन सांगितलं. आपल्याला मोठी संधी आहे, परंतु 15 मिनिटांत त्यांनी बैठक संपवली आणि नंतर बोलू असं म्हणत सुवर्णसंधी गमावली. काय झालं मलाही कळलं नाही. त्यामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत, ही खंत माझ्या मनात आहे.”

पटेल म्हणाले, ”आपल्या बाबत सध्या चुकीची माहिती पसरवली जातेय. परंतु मी, अजित पवार हे थेट जाऊन पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना जाऊन भेटलो. त्यावेळी त्यानी स्पष्ट सांगितलं की, आमची एक विचारधारा आहे. आम्ही त्यात तडजोड करु शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्याला याला परवानगी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाही.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये