ताज्या बातम्यामनोरंजन

प्राजक्ता माळीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, ‘या’ मालिकेत दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

मुंबई | Prajakta Mali – अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली होती. त्यानंतर तिनं अनेक मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता प्राजक्ता तब्बल सहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

सोनी मराठी (Sony Marathi) या वाहिनीवरील ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ (Post Office Ughad Aahe) या मालिकेत प्राजक्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो व्हिडीओ सोनी मराठीच्या ऑफिशिअल अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये प्राजक्ताची झलक पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्राजक्ताच्या येण्यानं पारगाव पोस्टात काय धमाल होणार आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तसंच प्राजक्ताला मालिकेत पुन्हा काम करताना पाहून तिचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत.

दरम्यान, प्राजक्तानं मालिकांबरोबरच अनेक मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. ‘चंद्रमुखी’, ‘पांडू’, ‘लकडाऊन बी पॉझिटीव्ह’, ‘पावनखिंड’ या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. तसंच सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सुत्रसंचालन करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये