“महाराष्ट्र आहेच लय भारी…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

मुंबई | Prajakta Mali – मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तसंच प्राजक्ता माळी ‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे चांगलीच चर्चेत आली होती. तसंच तिला अभिनयाबरोबरच भ्रमंती करायलाही आवडतं. प्राजक्ता महाराष्ट्राबरोबर भारताबाहेरही फिरली आहे. याबाबतच्या पोस्टदेखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

सध्या प्राजक्ता लंडनवारी करत आहे. याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच तिने तिच्या चाहत्यांना जागतिक प्रवास दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी तिने खास एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिने महाराष्ट्रातील काही पर्यटन स्ठळे दाखवली आहेत ज्यांना तिने भेटी दिल्या आहेत. यात मुंबई ,धारावी, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर ,लोणावळा ,नागपूर, अमरावती येथील तिचे फोटो आणि व्हिडीओ आहेत.

प्राजक्तानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “देशभरातल्या विविध ठिकाणांचा video post केल्यावर लक्षात आलं, महाराष्ट्रातल्या ठिकाणांचाही व्हिडीओ करायला हवा…त्याचा प्रवास तर फारच हृदयाजवळचा आहे…मी केवळ मराठी आहे म्हणून नाही तर “महाराष्ट्र” आहेच लय भारी. माझं भाग्य की ‘मस्त महाराष्ट्र’ कार्यक्रम, इतर अनेक शुटींग्स आणि इव्हेंट्सच्या निमित्तानं मला जवळपास सबंध महाराष्ट्र बघता, फिरता आला…(ह्या कार्यक्रमाचे episode ZEE5 वर आहेत…) जग फिरलो पण स्वत:चा भूभाग, संस्कृती माहिती नाही, असं झालं नाही. (अजूनही बरच बाकी आहे आणि कितीही फिरलं तरी हे वाटत राहणारच आहे, ते तसं वाटतं रहायलाही हवय…)”, प्राजक्ताची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.

Sumitra nalawade: