ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिवसेना-वंचितचं ठरलं! पण आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; म्हणाले…

मुंबई : (Prakash Ambedkar On Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवणार असं चित्र मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये यासंदर्भात बोलणी झालेली आहे. मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा वंचितला सोबत घेण्यासाठी विरोध असल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत वंचीत बहुजन विकास अघाडी ८३ जागा लढण्याची तयारी केली होती. मात्र शिवसेना जेवढ्या जागा सोडेल तेवढ्या जागा लढवू अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते म्हणाले, येणाऱ्या महापालिका निवडणुक शिवसेनेसोबत लढण्याचा निर्णय झालाय, मात्र शिवसेनेचा हा प्रयत्न आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाना देखील सोबत घेतलं पाहिजे त्यावर आम्ही म्हणालो आमचा त्याला विरोध नाही.

मात्र, मला सुत्रांकडून समजत आहे की या युतीला राष्ट्रवादीचा उघड विरोध आहे. तर काँग्रेसचा छुपा विरोध आहे. असं मला कळालं आहे. या पक्षाना वाटत नाही की गरीब मराठा सत्तेत यावा, म्हणून वंचितला विरोध आहे. असा गंभीर आरोप आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये