प्रकाश आंबेडकरांनी रिक्षाचालकाचा ‘तो’ फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंचा केला उल्लेख; म्हणाले, “माजी मुख्यमंत्र्यांसारखा…”
मुंबई | Prakash Ambedkar – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे नेहमी चर्चेत असतात. आताही ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) उल्लेख केला आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये.
प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवर एका रिक्षाचालकाचा फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये रिक्षाचालक आपलं कर्तव्य बजावत पुस्तक वाचताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे की, कर्तव्य आणि आस्था या दोन्हींमधील संतुलनाची सुंदर अशी प्रतिमा. मी राजगृहाकडे जात असताना हे वृद्ध गृहस्थ मला दिसले. त्यावेळी मी हे माझ्या कॅमेऱ्यात टिपले. पण फोटोच्या खराब दर्जाबद्दल माफ करा, कारण मी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांसारखा कुशल फोटोग्राफर नाहीये.
प्रकाश आंबेडकरांनी ही पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंचा मिश्कील असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.