“…तर तुम्हीच खरचं चंद्रावर आहात!” प्रकाश राज यांनी पुन्हा टोचले नेटकऱ्यांचे कान!
Prakash Raj clarifies his tweet on chandrayan 3 with cartoon : प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. पोटतिडकीनं भूमिका घेत त्यावर कोणाचीही भीती न बाळगता ते ठामपणे बोलत असतात. प्रकाश राज यांनी काल एका चहावाल्याचे कार्टून शेयर केले होते. सध्या त्यांचे हे चांद्रयान ३ वर केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
प्रकाश राज यांनी ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर आगपाखड केली होती. काहींनी त्यांना देशद्रोही असेही म्हटले होते. आपल्या ट्विटवरील वाढता वाद पाहून प्रकाश राज यांनी त्यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
कार्टूनमध्ये त्यांनी शर्ट आणि लुंगी परिधान केली असून ते एका कपातून दुसऱ्या कपात चहा ओतताना दाखवण्यात आले होते. त्यावेळी प्रकाश राज यांनी म्हटले होते की, ब्रेकींग न्यूज चंद्रावरुन पहिला फोटो आपल्या भेटीला. हॅशटॅग विक्रमलँडर…या ट्विटवरुन प्रकाश राज यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली आहे.
प्रकाश राज यांनी ट्विटवरुन प्रतिक्रिया देत म्हणाले, तुम्हाला जर माझ्या त्या बोलण्यातील विनोद कळला नसेल तर तुम्हीच खरचं चंद्रावर आहात. मी त्या ट्विटमधून हॅशटॅग आर्मस्ट्राँग च्यावेळचा विनोद शेयर केला आहे. यामध्ये मला ज्यांनी ट्रोल केले त्यांना नेमका कोणता चहावाला दिसला हे मला माहिती नाही. तुम्हाला मी काय म्हणालो हेच कळले नाही. त्यामुळे तुम्ही चंद्रावर आहात, असं त्यांनी म्हटलं आहे.