ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

तुम्ही एक भुजबळ पाडल्यास, आम्ही १६० मराठा आमदार पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा

मुंबई : (Prakash Shendge On Manoj Jarange) मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा-ओबीसी नेत्यांकडून एकमेकांविरोधात भूमिका घेतल्या जात आहेत. त्यातच आता काही मराठा नेत्यांनी ओबीसींची भूमिका मांडणाऱ्या मंत्री छगन भुजबळांना निवडणुकीत पाडण्याचं आवाहन केलं आहे. त्याला आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही १६० मराठा आमदार पाडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. ओबीसी समाजाची भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ मराठा समाजानं मतदान करु नये असं आवाहन केलं जात आहे. यापार्श्वभूमीवर प्रकाश शेंडगे यांनी हा इशारा दिला आहे.

प्रकाश शेंडगेंनी म्हटलं की, “ओबीसींसाठी लढणाऱ्या भुजबळांना पाडू अशा प्रकारची भाषा जर महाराष्ट्रात सुरु झाली तर मग ओबीसी समाज महाराष्ट्रात ६० टक्के आहे. प्रत्येक मतदारसंघात तो येतो. त्यामुळं जर छगन भुजबळांना जर तुम्ही पाडलंत तर मग हे सर्व ओबीसी १६० मराठा आमदार पाडल्याशिवाय राहणार नाहीत”

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी एकहाती लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात जालन्यात उद्या ओबीसी नेत्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. ‘आरक्षण बचाव एल्गार’ या सभेमुळं जालन्यात राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये