ताज्या बातम्यारणधुमाळी

“उद्धव ठाकरे यांचे भास्कर जाधव आयटम गर्ल…”, भाजप नेत्याचा खोचक टोला

मुंबई | Prasad Lad On Uddhav Thackeray And Bhaskar Jadhav – ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांची रत्नागिरीतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. याच चौकशीच्या निषेधार्थ 18 ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता भाजपकडून संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलं. या रॅलीत भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी प्रसाद लाड म्हणाले, “संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून आम्ही ज्यांनी आणीबाणी रॅली काढली त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. कसली आणीबाणी रॅली काढता. तुम्ही चिंधीचोर आहात. तुमच्यावर चोरीचे गुन्हे आहेत. आपण त्यांचं नावही घ्यायला नको. आपण वैभव नाईक यांचं नाव चिंधीचोर ठेवुया. तर भास्कर जाधवांचं नाव आयटम गर्ल ठेवुया. मी भास्कर जाधव यांचं भाषण ऐकलं. ते खूप नाटक करतात. चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर योग्य टीका केली आहे. या लोकांची नावं घेऊन आपण त्यांना मोठं करायचं नाही,” अशी टीका लाड यांनी केली आहे.

“चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा म्हणून एक आयटम साँग असते. अगदी तशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांचे भास्कर जाधव हे आयटम गर्ल आहेत. ते विधानसभेत एक बोलतात. बाहेर एक बोलतात. एवढीच ताकद होती, तर तुम्हाला (भास्कर जाधव) उद्धव ठाकरे यांनी मंत्री का केलं नाही. भास्कर जाधव उदय सामंत यांच्या पाया पडत होते. आज ते आम्हाला शिकवत आहेत. उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांचा बदला घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही,” असंही प्रसाद लाड म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये