ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

महापुरुषांनी भीक मागितली, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर ऍट्रोसिटीचा गुन्हा? पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक!

पुणे : (Prashant Jagtap On Chandrakant Patil) जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्च आणि राज्याचे तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हाय हाय म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात आंदोलन केले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील कार्यालाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणाबाजी करत हाय हाय ची घोषणाबाजी करण्यात आली आहे.

दरम्यान, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असं अजब विधान चंद्रकांत पाटील यांनी पैठणमध्ये केलं होतं. थोर महापुरुषांबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ त्यांच्याच कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.

कोथरूड येथील कर्वे पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी सह पोलिस आयुक्त यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये