दिल्लीत जी-२० परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली | G-20 Summit – जी-२० परिषदेसाठी (G-20 Summit) जगभरातील अनेक देशांचे नेते भारतात आले आहेत. ९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबरला नवी दिल्लीत नेत्यांची शिखर परिषद पार पडणार आहे. जी-२० शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत जोरदार तयारी सुरू आहे. परदेशी पाहुण्यांच्या आगमनासाठी सजावट करण्यात आली असून, रस्त्यांवर रोशणाईदेखील करण्यात आली आहे.
मात्र, यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागत आहे. पोलिसांना दिल्लीतील लोकांना छतावर देखील न जाण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीमधील झोपडपट्टी भाग जागतिक नेत्यांना दिसू नये यासाठी हिरव्या रंगाची शेडनेट लावण्यात आली होती. अशातच आपल्या घरात थांबणाऱ्या स्थानिकांसाठी पोलिसांनी फरमान सुनावले आहे.
पोलिसांनी घोषणा केली की ९ आणि १० सप्टेंबर या दिवशी छतावर येऊ नये. जी-२० परिषदेत जगभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सहभागी होणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्या ऐवजी त्यांच्या देशाचे प्रतिनिधी सामील होतील. यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली की, कोणत्या देशाचा नेता येत नाहीय याने काही फरक पडत नाही. त्यांनी पाठवलेल्या प्रतिनिधीला देशाची बाजू मांडता आली पाहिजे.