आणखी एका खासदाराकडून ठाकरेंना घरचा आहेर! म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी द्रोपदी मुर्मू यांना…”

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनंतर आता सर्वांचे लक्ष राष्ट्रपती निवडणुकींकडे लागले आहे. देशभरात बैठका आणि चर्चांना राजकीय वर्तुळात उद्धान आलेलं दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी देशातील अनेक मोठ्या नेत्यांना पत्र लिहून कॉंग्रेसला पाठींबा देण्याचं आवाहन केलं होतं. त्यात महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचादेखील समावेश होता.
१८ जुलै रोजी देशात राष्ट्रपती निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी भाजपकडून आदिवासी नेत्या द्रोपदी मुर्मू याचं नाव देण्यात आलेलं आहे तर कॉंग्रेस कडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सत्तांतर आणि शिवसेनेत झालेल्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील तणाव यामुळे उद्धव ठाकरेंची अस्वस्तता झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान महाविकास आघाडीत कॉंग्रेस सोबत असल्याने उद्धव ठाकरे यांना राष्ट्रपती निवडणुकीत कॉंग्रेसला पाठींबा द्यावा म्हणून विनंती केली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतीलच राहुल शेवाळे यांच्यानंतर आता राजेंद्र गावित यांनीही उद्धव ठाकरे यान भाजपच्या द्रोपदी मुर्मू यांना पाठींबा द्यावा अशी विनंती केली आहे.
राजकीय मतभेत न ठेवता पहिल्यांदाच आदिवासी महिलेला निवडून द्यायला हवं असं शिवसेनेच्या खासदारांकडून ठाकरे यांना सांगितल्या जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राष्ट्रपती निवडणुकीसाठी पेचात पडलेले दिसत आहेत.