क्राईमताज्या बातम्यापुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अश्लील भाष्य करणं पडलं महागात; पुण्यात तरुणावर गुन्हा दाखल

पुणे | सोशल मीडिया (Social Media) हा आजच्या युगातल्या नागरिकांच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. सोशल मीडियाचा वापर जितका चांगला ठरू शकतो, तितकाच तो कोणाच्या जिवावरही उठू शकतो. कारण सोशल मीडियामुळे दुर्घटनांना, गुन्ह्यांना आमंत्रण दिलं जाऊ शकतं. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सोशल मीडियावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हिंदू देवदेवतांबाबत अश्लील आणि अर्वाच्य भाष्य केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात 31 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सावंत असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. रवींद्र पडवळ यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा बुदमध्ये राहणाऱ्या मित्र सुजित खेडकर याच्या instagram वर शेअर केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच हिंदू देव देवतांविषयी बोलताना आणि प्रत्युत्तर देताना खालच्या आणि अश्लील भाषेत वाक्य वापरले. धार्मिक भावना दुखावल्या म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये